Be Yourself, Know Yourself!

It is not at all difficult to get healthy and think healthy. We can prevent ourselves from gaining extra weight by doing small things in our daily life and proper exercise. All it takes is that willpower and the realization that your healthy body is the most precious thing in your life.

obesity

एवढ्या दिवसात एवढे एवढे वजन कमी झाले किंवा बारीक झालं म्हणजे लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. ही नक्कीच उत्तम गोष्ट आहे पण मुळाशी जाऊन विचार केला तर आपल्या आवाक्यांपेक्षा आपण वजन वाढुनच का देतो असा प्रश्न कोणालाच का पडत नाही.

आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी काय करता येईल याचा विचार किती लोकं करतात?

याचं उत्तर सोपं आहे की हल्ली लोकांना आयुष्य खूपच easy going वाटायला लागलंय. त्यामुळे तब्येतीकडे पण हेळसांड होते आहे. कितीतरी जन्म वाट पाहिल्यावर मनुष्य जन्म मिळतो असं म्हणतात पण आपल्याला त्याची ही किंमत राहिली नाहीये.

विलासी,चैनी आणि आळशी वृत्ती वाढीस लागल्यामुळे उत्तम आरोग्य आणि मन कसं राखायच याचा गांभीर्याने विचार करायची परिस्थिती निर्माण झालीये हे नक्की.

निरोगी आरोग्य आणि विचार आचरणात येणं अजिबातच अवघड नाहीये आणि आपल्याला म्हणजे भारतीयांना तर नाहीच नाही कारण तशी परंपरा आपल्याला लाभलीये ज्यामध्ये उत्तम दिनक्रम, योग, प्राणायाम, मेडिटेशन या प्राचीन गोष्टी येतात.पण पाश्चात्य संस्कृतीने भारावून गेलेले आपण त्यांच्या चांगल्या गोष्टी आचरणात न आणता फक्त आणि फक्त चुकीच्या गोष्टींचा पाठपुरावा करतोय.

वजन वाढून शरीर बेढब दिसायला लागल्यावर लोकं जागे होतात आणि भरपूर पैसे घालवून मग वजन कमी करण्याच्या मागे लागतात.त्यातून काही परिणाम झाला तर खूष होऊन त्यांचे ‘आधी आणि नंतर’ चे फोटो फेसबुक किंवा पोस्टर वर झळकतात आणि नाही झाला तर निराश तरी होतात नाहीतर एकीकडे पैसे वाया गेले आता दुसरीकडे बघू म्हणून मोकळे होतात.काही अति आळशी लोकांना तर ते बेढब शरीर बघण्याची ही सवय होऊन जाते आणि ते सुडौल दिसावं यासाठी कुठलेही प्रयत्न करावेसे वाटत नाहीत.

हे टाळायचे असेल तर दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी आणि योग्य व्यायाम करून आपण स्वतःला अतिरिक्त वजन वाढवण्यापासून रोखू शकतो. फक्त त्यासाठी ती इच्छाशक्ती पाहिजे आणि आपले निरोगी शरीर ही आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे याची जाणीव पाहिजे.

आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी आपण नाही तर कोण आणि का घ्यायची?

त्यामुळे जागे व्हा लोक हो आणि योग्य वेळेत शरीराचा आणि आरोग्याचा आदर करायला शिका ज्याचे चांगले परिणाम तुम्हाला आयुष्यभर दिसत राहतील आणि इतरांपेक्षा वेगळं व्यक्तिमत्त्व बहाल करतील….

रोजचा काम सोडून उरलेला थोडा तरी वेळ स्वतःसाठी आणि स्वतःची तब्येत उत्तम राहावी यासाठी द्या आणि निरोगी आयुष्य जगा. दीर्घायुषी जगणं आपल्या हातात नाही पण जेवढे आयुष्य मिळालंय तेवढं निरोगी आणि निरामय नक्कीच होऊ शकतं यावर विश्वास ठेवा आणि कामाला लागा.

In English :

The happiness of a person has no limits, if his weight decreases unexpectedly.This is a good thing, of course, but no one wonders why you gain weight in the first place?

How many people think about what can be done to prevent getting sick rather than taking medicine after they get sick?

The simple answer is that people have started to take life casually these days. So health is also neglected. One needs to be grateful to be born as a human as it is said that being born as a human is a gift. It is said that a person is born as a human being after waiting too long, but we don’t value it.

The rise of luxuries and laziness has led to the need to think seriously about how to maintain good health and mind.

It is not at all difficult to get healthy and think healthy. Specially we, Indians, have a tradition that includes ancient rituals such as good daily routine, yoga, pranayama, meditation. But unfortunately, only few are following it.

People become aware about being healthy when their body starts to look awkward due to weight gain. Then they spend a lot of money, trying to lose weight. Some people who are very lazy start accepting their weight gain and don’t want to make any effort to make it fit and healthy.

We can prevent ourselves from gaining extra weight by doing small things in our daily life and proper exercise. All it takes is that willpower and the realization that your healthy body is the most precious thing in your life.

If you don’t care about your body and health, then who will?

So, wake up people and learn to respect the body and health at the right time which will give you good results throughout your life and a fit personality.
Give at least some of the time left from your daily work to keep yourself fit and healthy. Longevity is not in your hands but believe that whatever life you have, keep it as healthy as possible. Start working on it today!

Dr Ketaki Walunjkar
Dr Ketaki Walunjkar

Dr. Ketaki Walunjkar, a Physiotherapist, a Professional Bharatnatyam dancer and teacher and an enthusiastic trekker.
With 12 years of Physiotherapy experience in Pune, she has successfuly treated patients of all age groups.
Dr. Ketaki has been awarded 'Nritya Alankar' by Akhil Bharatiya Gandharva Mahavidyalaya, Miraj.

Articles: 2

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *