यावर बहुतेक लोकांचं उत्तर फिटनेस म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती असं असतं. एखाद्या व्यक्तीला जेव्हा प्रथमदर्शनी तुम्ही पाहता तेव्हा फक्त बाह्य रुपावरून तिच्या फिटनेसचा अंदाज बांधणे चुकीचं आहे.मुळात फिटनेस ही ‘दिसण्या’बरोबरच ‘असण्या’ची गोष्ट आहे.
फक्त प्रमाणबद्ध शरीरयष्टी म्हणजे फिटनेस नव्हे तर ‘शारीरिक,मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या निरोगी आणि कार्यरत असणे. अशी फिटनेस ची व्यापक व्याख्या केली जाऊ शकते.
यापैकी प्रत्येकाची थोडक्यात माहिती आपण करून घेऊ.
*शारीरिक तंदुरुस्ती (Physical Fitness)
म्हणजे थोडक्यात ‘functionality’. दैनंदिन व्यवहारातली सर्व कामे न थकता आणि न कंटाळता पार पाडून शिवाय ऊर्जा शिल्लक राहील इतपत शरीर तंदुरुस्त असणे म्हणजेच शारीरिक तंदुरुस्ती.
Physical fitness उत्तम असणे हे पुढील 5 घटकांवर अवलंबून असते.त्याची आपण थोडक्यात माहिती पाहू.
1.Cardiovasular Endurance म्हणजेच Aerobic Fitness
सतत व दीर्घकाळ काम करत राहण्यासाठी स्नायुंना सतत शुद्ध रक्ताचा पुरवठा करण्याची आपल्या हृदय आणि श्वसनसंस्थेची क्षमता म्हणजे CV(cardiovascular endurance). सोप्या शब्दात ‘स्टॅमिना’ या घटकात सुधारणा होण्यासाठी aerobic activities करणे गरजेचे आहे जसे की पोहणे, धावणे, सायकलिंग,क्लाइंबिंग,रोईंग इ..
2..Muscular Endurance
म्हणजे शरीराच्या स्नायूंची दीर्घकाळ कामांसाठी आकुंचन पावण्याची क्षमता. थोडक्यात स्नायुतील चिवटपणा. उदा:-सलग 1 तास टेकडी चढणे,धावणे,पोहणे,नाचणे इ
3..Musculo Skeletal Strength
म्हणजे स्नायूंमधील ताकद. कुठलही ताकदीचं काम करण्यासाठी स्नायू, हाडं,Tendons(bone to muscle connection), Ligaments (muscle to muscle connection) यांनी एकत्रित रित्या लावलेली शक्ती. या घटकात सुधारणा होण्यासाठी वेट ट्रेनिंग करणे गरजेचे असते.
4..Flexibility (स्नायूंमधील लवचिकता)
आपल्या शरीरात ज्या काही हालचाली होतात त्या सांध्यांमध्ये होतात. त्या घडवून आणण्यासाठी स्नायूंची मदत लागते. त्यामुळे स्नायू जेवढे लवचिक (elasticity & extensibility of muscles) तेवढी हालचाल सुलभ होते. ही लवचिकता वाढवण्यासाठी स्नायूंना योग्य प्रकारे ताण देणे(stretching) महत्वाचे असते.
5..Ideal Body composition (शरीर संरचना)
शरीरातील स्नायू आणि फॅट म्हणजेच मेद यांचे योग्य प्रमाण असणे म्हणजेच Ideal Body Composition असणे होय. यात स्त्रियांचे शरीरातील मेदाचे प्रमाण एकूण वजनाच्या 20% पेक्ष्या जास्त असू नये आणि हेच प्रमाण पुरुषांचे 15% जास्त नसले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी योग्य व्यायाम,पोषक आहार आणि विश्रांती खूप महत्त्वाची आहे.
* मानसिक तंदुरुस्ती (Mental and Emotional Fitness)
शरीर सुदृढ राहण्यासाठी मुळात मन निरोगी असणे अत्यंत महत्वाचे आहे.
मानवामध्ये कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार किंवा असमतोल झाला कि त्याचा परिणाम थेट शरीरावर दिसतो जसे की अचानक वजन कमी होणे, त्वचा निस्तेज होणे,केस गळणे, सतत थकल्यासारखे वाटणे,भूक न लागणे/अतिभूक लागणे, निद्रानाश/सारखी झोप येणे अशी टोकाची लक्षण दिसून येतात.
त्यामुळे निरोगी शरीर हवे असेल तर कुठल्याही परिस्थितीत मानसिकरित्या तंदुरुस्त असणे क्रम प्राप्त आहे. त्यासाठी सकारात्मक विचार,आत्मपरीक्षण,ध्यान,चिंतन या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो.
*सामाजिक तंदुरुस्ती (Social Fitness)
सामाजिक तंदुरुस्ती ही खरं तर खूप व्यापक संकल्पना आहे. पण माणूस हा पूर्वीपासून समाजप्रिय प्राणी असल्याने त्याला समूहात राहणे आवडते.
समाजात वावरताना पाळायचे नियम काटेकोरपणे पाळणे म्हणजेच सामाजिक तंदुरुस्ती असे आपण म्हणू शकतो.यात वाहतुकीचे नियम पाळणे, सामाजिक जबाबदाऱ्यांचे भान असणे, कुठल्याही प्रकारची सामाजिक विकृती नसणे या गोष्टींचा समावेश होतो.
In English:
The answer to most people is that fitness means being physically strong. When you see a person at first sight, it is wrong to judge his fitness only from his appearance. Basically, fitness is a matter of ‘appearance’ as well as ‘being’.
Fitness can be broadly defined as ‘being physically, mentally and socially healthy and functioning’, not just a balanced body.We will briefly describe each of these.
* Physical Fitness
In short, ‘functionality’. To be physically fit, is to have enough energy to carry out all the tasks of daily life without getting tired and bored. Physical fitness depends on the following 5 factors. Let’s take a look at it.
1.Cardiovascular Endurance ( meaning, aerobic fitness)
CV (cardiovascular endurance) is the ability of your heart and respiratory system to constantly supply pure blood to the muscles for continuous and long-term work.It means ‘Stamina’ in simple words.Aerobic activities like swimming, running, cycling, climbing, rowing etc. are required to improve this factor.
2.Muscular Endurance
It is the ability of the body’s muscles to contract for long-term work. In short, the ability of the muscles to work without getting fatigued.. Ex: 1 hour hill climbing, running, swimming, dancing etc.
3.Musculoskeletal strength i.e. strength in the muscles.
The force exerted by muscles, bones, tendons, ligaments together to perform any action. Weight training is needed to improve this factor.
4.Flexibility
The movements that take place in our body take place in the joints. It takes the help of muscles to make that happen. Therefore, the more elasticity & extensibility of muscles, the easier the movement. It is important to stretch the muscles properly to increase this flexibility.
5.Ideal Body composition
Having the right amount of muscle and fat is the ideal body composition. The body fat content of women should not be more than 20% of the total weight and the same proportion should not be more than 15% for men. Proper exercise, nutritious diet and rest are very important to achieve this.
* Mental and Emotional Fitness
Keeping the mind healthy is very important for keeping the body healthy.
In humans, any type of mental illness or imbalance has a direct effect on the body, such as sudden weight loss, skin dullness, hair loss, constant tiredness, loss of appetite / overeating, insomnia / sleep deprivation. So if you want a healthy body, you have to be mentally fit in any situation. It definitely benefits from positive thinking, introspection, meditation and contemplation.
* Social fitness
Social fitness is in fact a very broad concept. But since man is already a social animal, he likes to be in a group. Strict adherence to social norms in the society means social fitness. These include observance of traffic rules, awareness of social responsibilities, and no social evils of any kind.